ऑक्टोबर २७ ला कळमना जलकुंभ, सुभान नगर जलकुंभ ३० ला, मिनिमाता नगर जलकुंभ ३१ ला , भांडेवाडी जलकुंभ नोव्हेंबर २ ला आणि भारतवाडी जलकुंभ स्वच्छता नोव्हें. ३ ला
नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ
स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत अंतर्गत लकडगंज झोन मधील ५ जलकुंभ ऑक्टोबर २७ ते ३ नोव्हेंबर १९ दरम्यान जलकुंभ स्वच्छ करण्यात येणार आहे.
मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने दरवर्षीच सुरु केलेली आहे आणि ह्यावर्षी हि १३ वी वार्षिक मोहीम असेल . लकडगंज झोन अंतर्गत ऑक्टोबर २७ ला कळमना जलकुंभ, सुभान नगर जलकुंभ ३० ला, मिनिमाता नगर जलकुंभ ३१ ला , भांडेवाडी जलकुंभ नोव्हेंबर २ ला आणि भारतवाडी ३ ला स्वच्छता करण्यात येतील.
सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ ह्या साधारण ८ ते ९ तासांच्या कालावधीत दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे जलकुंभ भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.
ऑक्टोबर २७ (शुक्रवार) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग –
कळमना जलकुंभ :पुंजारामवाडी , वैरागडेवाडी, बाजार चौक, गोपाळ नगर, संजय नगर, साखरकर वाडी , चिखली बस्ती, एनआयटी क्वार्टर्स , चिखली ले आउट इंडस्ट्रियल भाग , कुंभारपूरा , खापरे मोहल्ला, नागराज चौक आणि इतर परिसर
ऑक्टोबर ३० (सोमवार) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
सुभान नगर जलकुंभ: सुभान नगर , चंद्र नगर, भारत नगर, शिक्षक कॉलनी, कळमना मार्केट, साई नगर, नेताजी नगर, मंगलदीप कॉलोनी, विजय नगर, लक्ष्मि नगर, गुलमोहर नगर, महादेव सोसायटी, विकास आनंद सोसायटी, गौरी नगर, ओम नगर , तलमले ले आउट, दुर्गा नगर, नेव हनुमान नगर , पुष्पक सोसायटी, म्हाडा कॉलोनी , भारतवाद, गुजराती कॉलोनी , जुनी पारडी , एच बी टाऊन , आभा कॉलोनी, शिक्षक कॉलोनी , ओम नगर, तलमले नगर
ऑक्टोबर ३१ (मंगळवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
मिनिमाता नगर जलकुंभ: मिनिमाता नगर , जानकी नगर, पांच झोपडा परिसर, जलाराम नगर, सूर्य नगर एसआरए योजना घरकुल, जनता कॉलोनी, चिखली ले आउट इंडस्ट्रियल भाग
नोव्हेंबर २ (गुरुवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
भांडेवाडी जलकुंभ: पावनशक्ती नगर, अबूमियाँ नगर, तुलसी नगर, अंतुजि नगर, मेहेर कॉलोनी, साहिल नगर, सर्जू टाऊन, कहानांदवाणी टाऊन , वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, महेश नगर, सुरज नगर, आणि इतर परिसर विश्व शांती ले आउट, खान्द्वानी टाउन शिप, महेश नगर , चंद्रमणी नगर , पवनशक्ती नगर, माता नगर आणि मिलन नगर.
नोव्हेंबर ३ (शुक्रवार ) रोजी पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
भारतवाडी (देशपांडे ले आउट )जलकुंभ:देशपांडे ले आउट , आदर्श नगर स्लम , हिवारी कोटा , शैलेश नगर , देवी नगर, कामाक्षी नगर, सदाशिव नगर, वाठोडा बस्ती, घर संसार सोसाटी, सैलसर विहार कॉलोनी, नवीन सुरज नगर आणि संघर्ष नगर…
ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने लकडगंज झोन मधील नागरिकांना जलकुंभ स्वच्छता मोहिमे दरम्यान पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत. अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.