Published On : Tue, Dec 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

ललित पाटील ड्रग्स प्रकरण ; सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात ठणकावले

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी नागपूर विधान परिषदेत चर्चा
Advertisement

नागपूर : ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मंगळवारी विधान परिषदेत चर्चा झाली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. सरकार ड्रग्स प्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे विधान फडणवीस यांनी आज सभागृहात केले. हा पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. ललित पाटील प्रकरणी ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त केले आहे. त्याचसोबत आवश्यकता भासल्यास त्यांना अटक करायलाही मागे पुढे पाहिले जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

गेल्या २ महिन्यात ड्रग्स प्रकरणी प्रचंड मोठ्या कारवाया झाल्या आहेत. जर आपण यावर कारवाई केली नाही तर भावी पिढीला उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्स विक्री केली जाते.त्यावरही पोलिसांचे लक्ष आहे असे त्यांनी सांगितले.आपल्याकडे आपल्या देशातील लोक वेगवेगळ्या फॅक्टरीत ड्रग्स तयार करत आहेत, हे दुर्दैवी आहे. राज्य सरकार या प्रकरणी रोज कुठे ना कुठे छापे टाकून कारवाई करत आहेत. या प्रकरणी कोणालाही सरकार पाठिशी घालणार नाही असेही फडणवीस म्हणाले.

Advertisement
Monday's Rate
Sat 23 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. एका कैद्याला ७ महिने ससूनमध्ये ठेवले जाते. तिथेच गेटवर ड्रग्स सापडले जातात. त्यानंतर तो आरोपी ससूनमधून फरार होतो. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून त्याचा शोध आहे. हे प्रकरण सरकारसाठी आव्हात्मक आहे. दक्षिण भारतातून ललित पाटीलला अटक केली. हा आरोपी पळाला नाही तर त्याला पळवले असे त्याने प्रसार माध्यमांना सांगितले. यामागे कोणाचा हात आहे, यामागचा शोध घेणे गरजेचे असल्याचे अहिर म्हणाले. या प्रकरणात काहींना अटक केली. पण ललित पाटील याच्यावर ज्यांनी उपचार केले ते संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप कारवाई नाही. या प्रकरणी नार्को टेस्ट करावी. हे प्रकरण आपण सीबीआयला देणार का असा प्रश्न अहिर यांनी सभागृहात उपस्थित केला.

Advertisement