Published On : Mon, Apr 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

तुला हा शेवटचा इशारा…गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत बिश्नोई गँगची अभिनेता सलमान खानला धमकी

Advertisement

नागपूर:बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली बिश्नोई गँगने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे.अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचे मान्य केले आहे.

फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या गँगने याबद्दल खुलासा केला.अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही.अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी याचा बारकाईने तपास करीत आहेत.
दरम्यान दोन अज्ञात तरुणांनी सलमानच्या घराच्या बाहेरील भिंतीवर गोळ्या झाडल्या. याच बाल्कनीतून सलमानने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान खान अनेकदा त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत दिसतो. या बाल्कनीवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाचा पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरु केला आहे.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अनमोल बिश्नोईची पोस्ट –
अनमोल बिश्नोई ओम. जय श्री राम. जय गुरु भवेश्वर. जय गुरु दयानंद सरस्वती. जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल तर युद्ध योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं आहे. तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केले आहे. तुला हा शेवटचा इशारा आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत. ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानल आहेस. त्यांच्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. बाकी मला बोलायची सवय नाही.
जय श्री राम जय भारत सलाम शाहिदा (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) गोल्डी ब्रार रोहित गोदरा कला जठारी…!!

Advertisement