कन्हान : – कित्येक वर्षापासुन कन्हान शहरातील आठवडी व गुजरी बाजार नागपुर जबलपुर राष्ट्रीय माहामार्गावर भरत असल्याने नेहमी अपघाताची टागती तलवार बाजार करण्या-या नागरिकांवर व दुकानदारावर राहत असल्याने मोकळ्या मैदानात बाजाराचा शुभारंभ झाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेत आंनद व्यकत केला आहे.
नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत आठवडी बाजाराला जागा उपलब्ध होत नसल्याने शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरणा-या आठवडी बाजारा त नागरिकांनी जीव मुठीत घेऊन बाजार करावा लागत असल्याने कित्येक वर्षा पासुन आठवडी व गुजरी बाजार मोकळ या जागेत भरवण्याची मागणी नागरिकां नी रेटुन धरल्याने अखेर नगरपरिषदेने अस्थायी का होईना अशोकनगर वार्ड क्र ५ पिपरी रोड येथील श्री संदीप कक्कड परिवारांची अडीच एकर रिकामी जागा किरायाने घेऊन तेथे तात्पुरती बाजारा करिता व्यवस्था करून आज शुक्रवार (दि.२२) ला मोकळ्या मैदानात आठवडी बाजारांचा शुभारंभ करून दुकानदारांना दुकानाकरिता जागा उपलब्ध करून देऊन स्वत: नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व नगरसेवक, नगरसेविकांनी व मान्यवरांनी उपस्थित राहुन आठवडी बाजारांची सुरूवात करून दिल्याने
परिसरातील महिला, पुरुष नागरिकांनी व दुकानदारांनी नगरपरिषद कन्हान-पिपरीचे नगराध्यक्ष शंकरभाऊ चहांदे, उपाध्यक्ष मनोहर पाठक, आरोग्य व स्वच्छता सभापती गेंदलाल काठोके, पाणी पुरवठा सभापती मनोज कुरडकर, महिला व बालकल्याण सभापती नितु गजभिये, मुख्याधिकारी सतिश गावंडे, मनोनित नगरसेवक राजेंद्र शेंदरे सह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांचे आभार व्यकत केले आहे.
अनेक वर्षापासुन आठवडी बाजार महामार्गावर भरत असल्याने अपघाताची कायम टागती तलवार बाजार करणाऱ्या ग्राहकांना व दुकानदारांवर रहात होती. त्यामुळे आज अपुऱ्या का होईना मोकळ्या जागेवर सुविधेच्या अभाव असतानी सुध्दा बाजार भरविण्यात आल्याने पिपरी रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन थोडा त्रास जरी झाला तरी सुध्दा नागरिकांनी मोकळ्या जागेत आठवडी बाजार भरविण्यात आल्याने मोकळा श्वास घेत आंनद व्यकत केला आहे. पहिल्यांदा शुक्रवारी माहामार्गाची वाहतुक सुध्दा सुरळीत बघायला मिळाली.
आठवडी व गुजरी बाजाराची ज्वलंत समस्या सोडविणार – शंकर चहांदे
कित्येक वर्षापासुन भेडसवणा-या कन्हान शहरातील आठवडी व गुजरी बाजाराची ज्वलंत समस्या सोडविण्याचा पहिला पर्यंत केला असुन नागरिकांची व दुकानदारांची व्यवस्थित साथ मिळाली तर बाजारा संबंधित सर्व समस्या एक एक का होईना सोडवुन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर मी पर्यंत करित असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष शंकरभाऊ चहांदे हयानी व्यकत केली.