Advertisement
नागपूर: खात या गावात सुमारे 34 लक्ष रुपयांच्या हायमास्ट लाईटचे व एलईडी लाईटचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांच्या हस्ते झाले. महाऊर्जातर्फे हे काम करण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी जि.प. उपाध्यक्ष सदानंद निमकर, अशोक हटवार, योगेश वाडीभस्मे, मुकेश अग‘ाल, कैलास वैद्य, हरीश जैन, नरेश मोटघरे, महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन याप्रसंगी उपस्थित होते.
खात येथे 12 मीटर व 9 मीटर उंचीचे हायमास्ट लावण्यात आले. नवीन आरएसजे पोलसह एलईडी लाईट लावण्यात आले. जुने लाईट बदलण्यात येऊन त्या ठिकाणी नवीन लाईट लावण्यात आले. 12 मीटरचे 3 व 9 मीटरचे 3 हायमास्ट, तसेच 9 आरएसजे पोल व 25 ते 36 वॅटचे एकूण 68 लाईट बदलण्यात येऊन नवीन लाईट लावण्यात आले. या कार्यक‘मालाही गावकरी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.