महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून म.न.पा.तर्फे अत्यंत साधेपणाने कार्यक्रम संपन्न
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त नाग नदी, पिवळी व पोहरा नदयांचे स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी (ता.११ एप्रिल) रोजी करण्यात आला. तिन्ही ठिकाणी कार्यक्रम कोरोना -१९ च्या दिशानिर्देशाचे पालन करुन अत्यंत साधेपणाने पार पडला.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने यावर्षी सुध्दा पावसाळा सुरु होण्याच्या आधीच मनपाव्दारे लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नाग नदी स्वच्छता अभियानाचे अंतर्गत अशोक चौक ते सेंट झेवीयर स्कूल दरम्यानचे नाग नदीचे स्वच्छता अभियानास अशोक चौक येथे प्रारंभ झाला. माजी महापौर व आमदार श्री. प्रवीण दटके व उपमहापौर मनीषा धावडे गांधीबाग झोन सभापती श्रध्दा पाठक, धंतोली झोन सभापती वंदना भगत यांचे हस्ते यंत्रसामुग्रीची पुजा करुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मनोज साबळे, गांधीबाग झोनचे सहा.आयुक्त अशोक पाटील, धंतोली झोनच्या सहा.आयुक्त किरण बगडे, कार्यकारी अभियंता धनंजय मेंडुलकर, उप अभियंता नरेश शिंगणजोडे, उप अभियंता कोटांगळे, शाखा अभियंता पुरुषोत्तम फाळके, कनिष्ठ अभियंता पी.एस.ढोरे, विभागीय अधिकारी (स्वच्छता) झोन क्र.४ धर्मेंद्र पाटील, झोन क्र.६ सुरेश खरे, स्वच्छता निरीक्षक अरुण तुर्केल, सुरेश दामनकर, गोविंद खरे आदी उपस्थित होते.
तसेच पिवळी नदी वर झोन क्र.१० अंतर्गत येणारा नारा घाट जवळील नदीचे स्वच्छता अभियानाची सुरुवात सत्तापक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे, झोन सभापती श्रीमती प्रमिला मथराणी, आरोग्य समिती चे माजी सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा, नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, कर व कर आकारणी समितीचे सभापती श्री. महेन्द्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक श्री.सुनिल अग्रवाल यांनी पोकल्यांड चे विधीवत पुजा करुन केली.
याप्रसंगी कार्य. अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. राजेश भुतकर, मंगळवारी झोनचे सहाय्यक आयुक्त हरीष राऊत, नदी व सरोवरे प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, अभियंता श्री. बानाबाकोडे, स्वास्थ निरिक्षक रोशन जांभूळकर व भुषण गजभीये आदी उपस्थित होते.
सहकार नगर घाट जवळ पोहरा नदीवर स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती पल्लवी शामकुळे, विधी समिती सभापती श्रीमती मीनाक्षी तेलगोटे, माजी आमदार श्री. अनिल सोले, नगरसेविका श्रीमती वनिता दांडेकर व नगरसेवक श्री.किशोर वानखेडे यांनी विधीवत यंत्रसामुग्रीचे पूजन करुन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. यावेळी लक्ष्मीनगरचे सहाय्यक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, उप अभियंता श्री.निलेश बोबडे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. रामभाऊ तिडके, समाजसेवक नारायण आहूजा, किशोर धर्मे, गिरीश श्रीरामे उपस्थित होते.
नदी स्वच्छता अभियान राबविण्याकरीता शासकीय, निम शासकीय, खासगी विभाग तसेच शहरातील विविध सामाजीक संस्थांशी संपर्क साधून त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
यावर्षी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येईल. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नदी काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. सोबतच या तिनही नद्यांच्या काठावर पावसाळ्याच्या सुरूवातीला जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना झाडे लावण्याकरिता प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्न महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे. नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नद्यांचे उपभाग करण्यात आले असून यामध्ये प्रत्येकी १ उपअभियंता व १ सी.एस.ओ. लावण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांचे जलसंधारणासाठी मोठे योगदान : महापौर
सुमारे २०० वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी जलसंधारणासाठी नदयांचे खोलीकरण करुन स्वच्छता करावी व त्याचा गाळ शेतीचे कामासाठी वापरण्यात यावा असे तत्कालिन इंग्रज सरकारला सुचविले होते. म.फुले यांचे जलसंधारणाकरीता अश्याप्रकारे मोठे योगदान असून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून म.न.पा.ने नदी स्वच्छता अभियानास आज प्रारंभ केला, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी आवर्जुन सांगितले. सद्या कोरोना विलगीकरणात असल्यामुळे ते या कार्यक्रमास व्यक्तिश: सहभागी होवू शकले नाही.
नदीकाठावर होणार वृक्षारोपण
नदी स्वच्छता अभियानासोबतच यावर्षी तीनही नद्यांच्या काठावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षरोपणाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरा नदीपासून सुरूवात केली जाणार आहे. यामध्ये फळ, औषधींची झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच वृक्षारोपणात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी स्मृती वृक्ष, ग्रह उद्यान, नक्षत्र उद्यान, वन औषधी, फळ वृक्षारोपण जून महिन्यापासून करण्याच्या सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिल्या आहेत. तसेच वृक्षांचे पालकत्व देण्यात येईल. नागरिकसुध्दा वृक्षांचे जतन व संवर्धन करतील.
नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी नाग, पिवळी व पोहरा नदीचे भाग करण्यात आले आहे.
नाग नदी
१.अंबाझरी तलाव ते पंचशील चौक
२.पंचशील चौक ते अशोक चौक
३.अशोक चौक ते सेंट जेविअर स्कूल
४.सेंट जेविअर स्कूल ते पारडी ब्रिज (भंडारा रोड)
५.पारडी ब्रिज ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)
पिवळी नदी
१.गोरेवाडा तलाव ते मानकापूर दहन घाट
२.मानकापूर दहन घाट ते कामठी रोड पुलिया
३.कामठी रोड पुलिया ते जुनी कामठी रोड पुलिया
४.जुनी कामठी रोड पुलिया ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम)
पोहरा नदी
१.सहकार नगर ते नरेंद्र नगर पुलिया
२.नरेंद्र नगर ते पिपळा फाटा
३.पिपळा फाटा ते नरसाळा विहिरगांव