Published On : Sat, Aug 31st, 2019

मतदान यंत्र प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

Advertisement

कामठी :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता कामठी तहसिल कार्यालय निवडणूक विभागाने आपल्या कामाला गती दिली असून मतदारांचे मतदान यंत्राबाबत कुठलेही आक्षेप न राहावे तसेच निवडणूक मतदान हे पारदर्शक पद्धतीने वहावे या मुख्य उद्देशाने निवडणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन व विव्हीपॅट मशीन या मतदान संयंत्राच्या बाबतीत जनजगृती करून मतदारांना प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.यानुसार कामठी विधानसभा मतदार संघा अंतर्गत कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण या तीन तालुक्यातील 480 मतदान केंद्रावर मतदान यंत्र प्रशिक्षण देत मतदान यंत्रातील ईव्हीएम मशीन व विव्हीपॅट चा वापर बाबत जनजागृती करण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणुकांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने विव्हीपॅट हे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकापासून आणलेले आहे.मतदाराला या यंत्रावर असलेल्या पारदर्शक खिडकीवर पेपर स्लिप च्या माध्यमातून आपण केलेले मतदान इच्छित उमेदवारास गेल्याची खात्री करता येते. मतदान यंत्रमध्ये असणाऱ्या बेलेट युनिट, विवंहिपॅट मशीन, कंट्रोल युनिट व बॅटरी सह सर्व अनुषंगिक घटक कसे काम करतो याबाबतची प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच मतदारांसमोर मतदान व मतमोजणी व विव्हीपॅट व कंट्रोल युनिट यंत्रातील मतांचा ताळमेळ याबत सुद्धा प्रशिक्षण देण्यात येत आहे तेव्हा या मतदान यंत्र जनजागृती व प्रशिक्षण मोहिमेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान कामठी-मौदा उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement