नागपूर: शिस्त प्रिय, कर्तव्याशी कोणतीही तडजोड न करणारा प्रामाणिक व वेळेचे पालन करणारा अधिकारी गमावल्याने विधी खात्याचे मोठे नुकसान झाले. ही हानी कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मला त्यांच्याकडून ब-याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ते जितके कडक शिस्तीची होते तितकेच भावनिक सुद्धा होते. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्राप्त व्हावी यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाधरराव जयदेवराव अकर्ते (61) यांना मान्यवरांच्या उपस्थित साश्रू नयांनी मानेवाडा स्मशानभूमीत निरोप देण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी माजी पोलिस उपायुक्त रामदास सोनकुसरे, अकोला मेडिकल कॉलेजचे डीन तसेच लता मंगेशकर मेडिकल कॉलेजचे प्रो. डॉ. हरीभाउ काठाडे, अमरावतीचे अॅड. प्रवीण पाटील, अॅड. विजय कोठाळे, अॅड. सी. व्ही. देशमुख, अॅड. नितीन बिजवे, अॅड. एम. के. देशमुख, अॅड. गजेंद्र सदार, अॅड. दापूरकर, अॅड. अनिल कडू, अॅड. प्रदीप वाठोडे, अॅड. नानासाहेब गुल्हाणे, भारतीय स्टेट बँकेचे मनोज कुमार तरुण, भंडा-याचे अरुण निर्वाण, अभियंता अविनाश आमले, एक्झीक्युटिव्ह इंजिनियर येरीगेशन डिपाटमेंटचे श्री. हेडाउ, शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रा. सतीश पाटील, प्रगती मेडिकलचे मंगेश नेरकर, अॅड. प्रशांत यावले, अॅड. देशमुख उपस्थित होते.