– ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान नोंदविता येणार हरकती व सूचना
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी २८ मे रोजी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे सकाळी ११ वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढली जाणार आहे
आरक्षणाची सोडत काढल्यानंतर शनिवार ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या शनिवार ३० जुलै ते मंगळवार २ ऑगस्ट या कालावधीत दुपारी ३ वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे, अशी सूचना मनपा निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे.