नागपूर: भारतीय विचार मंच नागपूर महानगर तर्फे विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने हिंदू विचारवंत श्री कॉर्नल्ड एल्स्ट यांचे “हिंदू धर्मापुढील आव्हाने” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कॉरनॉल्ड यांनी स्वातंत्र्यापासून ते आता पर्यंतच्या भारतातील हिंदूच्या समोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा परामर्श घेतला. श्री कॉर्नल्ड एल्स्ट बेल्जियममधील महान विचारवंत, लेखक आणि पत्रकार, जे हिंदू धर्म आणि हिंदुत्व चळवळीचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी हिंदूत्वावर अनेक पुस्तके लिहिली.त्यांनी हिंदू नव जागरणाचे वर्णन स्वामी विवेकानंदांपासून सुरू केले आणि हिंदू महासभा, आरएसएस, बजरंग दल इत्यादींच्या हिंदुत्वाचा राजकीय इतिहास सांगितला.
श्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानापासून ते श्री लालकृष्ण अडवाणींच्या रामजन्मभूमी रथयात्रा पर्यंत आणि आजपर्यंतची चर्चा त्यांनी केली.भारतातील लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबद्दल ते थोडे निराश होते. ते म्हणाले की ख्रिस्ती धर्म पाश्चिमात्य देश गमावत आहे. यहुदी धर्माचा पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेतील इस्लामसाठी रक्तपाताच्या रानटी इतिहास आहे.सनातन धर्म हा शेवटी चिकाटीचाच आहे, असे ते म्हणाले; कारण हे परम सत्य आहे जे सर्वव्यापी आहे.
तत्पूर्वी श्री सुनीलजी किटकरू यांनी प्रस्तावना व विषयाची भूमिका मांडली. , प्रस्ताविकात सुनीलजी म्हणाले भारतीय चिंतन, भारतीय समाजाला ह्रदयापासुन प्रेम करणारे मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता,अॅनी बेजेंट,श्री माँ अशी विदेशी व्यक्तींची श्रृंखला आहे त्याच कडीतील कॉर्नल्ड एल्स्ट आहेत.हजार वर्षाच्या परकीय आक्रमणला तोंड देत डॉ हेडगेवारांची राष्ट्रीय स्वयसेवक संघ ,शतकाकड़े वाटचाल करीत संगठित,आत्मविश्वास युक्त विजिजिशु हिंदू समाज उभा करण्यात यशस्वी होत आहे.
कार्यक्रमाची व्यवस्था युवा आयाम ने सांभाळली. गीत नागपूरचे सुप्रसिद्ध गायक संजयजी काटे यांनी सादर केले. पाहुण्यांचे स्वागत श्री एम् एल् नारायणन यांनी केले. आभार प्रदर्शन भाग्यश्री दिवाण यांनी केले तर सुत्र संचलन अंजली ठोंबरे यांनी केले.