Published On : Mon, Jul 1st, 2024

विधान परिषद निवडणूक; भाजपाकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर;पंकजा मुंडेंसह ‘या’ नेत्यांना संधी

Advertisement

मुंबई : भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.

येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभा संख्येनुसार भाजपा पाचा जागा लढविणार असून एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी अजित पवार प्रत्येकी दोन जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत.

Advertisement

दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर सातत्याने त्यांचे राजकीय पूनर्वसन करण्यात यावे अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार आता भाजप नेतृत्वाने त्यांना विधान परिषद निवडणूक लढण्याची संधी दिली.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम?
25 जून – अधिसूचना जारी
2 जुलै – अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
3 जुलै – अर्ज छाणणी
5 जुलै – अर्ज मागे घेण्याची तारीख
12 जुलै – मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
12 जुलै – मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता