नागपूर: गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाजवळील निवासी भागात बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इतकेच नाही तर पश्चिम नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने एका बछड्याला ठार मारल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. ही घटना झिंगाबाई टाकळी रस्त्यावरील हाय टेन्शन टॉवर लाईनपासून ५०० मीटर अंतरावर घडली असून याठिकाणापासून गोरेवाडा प्राणीसंग्रहालय परिसर अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे.
माहितीनुसार, सावंत सोसायटीत रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील एका तरुणाने बिबट्याला पाहिल्याने खळबळ उडाली. बिबट्या दिसल्याच्या वृत्तानंतर बछड्यावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निकांनी कारवाई करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्यापही तो हाती लागलेला नाही. स्थानिकांनी याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असून त्यांनी यासंदर्भात वनविभागाला कळविले आहे.