नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली.शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना कारवा लागत आहे.
यातच पुढील सहा दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे, तर १९ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात सामान्य स्थिती असल्यामुळे राज्यात पडणारा मोसमी पाऊस दडी मारून बसला आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. मात्र येत्या सहा दिवसांत मोसमी पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.