Published On : Sat, Jul 25th, 2020

नागपुरात भाजप-राष्ट्रवादीमध्ये पत्रयुद्ध सुरू

Advertisement

नागपूर : एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले पोस्टकार्ड पाठविले तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जय भवानी-जय शिवाजी लिहिलेले पत्र पाठविण्यात आले.

शरद पवार यांनी अयोध्येतील राममंदिराबाबत दिलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे हरिहर मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले. भाजयुमो, पूर्व नागपूरतर्फे जय श्रीराम लिहिलेले १० हजार पोस्टकार्ड पवार यांना पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पवार त्याला जाणुनबुजून विरोध करत असल्याचे प्रतिपादन आ. कृष्णा खोपडे यांनी केले. आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, बाल्या बोरकर, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, प्रमोद पेंडके, महेंद्र राऊत, सचिन करारे, बालू रारोकर, सनी राऊत, चेतना टांक, सरिता कावरे, कांता रारोकर, राजकुमार सेलोकर,मनिषा अतकरे, अभिरुचि राजगिरे, मनिषा धावडे, अनिल गेंडरे, दीपक वाडीभस्मे, जयश्री रारोकर, समिता चकोले, रेखा साकोरे, सेतराम सेलोकर, गुड्डू पांडे, पिंटू पटेल, बंटी शर्मा, जे.पी.शर्मा, रितेश राठे, शुभम पठाडे, आशिष मेहर, मंगेश धार्मिक, गोविंदा काटेकर, हर्षल मलमकर, अतुल कावले, प्रदीप भुजाडे, विकास रहांगडाले, सौरभ भोयर, शंकर विश्वकर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय जीपीओमधूनदेखील भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना पत्र पाठविले.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजयुमोच्या शहराध्यक्षा शिवानी दाणी वखरे, महामंत्री राहुल खंगार, दिपांशु लिंगायत, रितेश रहाटे, अथर्व त्रिवेदी, पुष्कर पोरशेट्टीवार, सागर गंधर्व, प्रसाद मुजुमदार, संकेत कुकडे, अक्षय ठवकर, रोहित त्रिवेदी, स्वप्नील खडगी प्रामुख्याने उपस्थित होते.

दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फेदेखील व्यंकय्या नायडू यांना हजारो पत्र पाठविण्यात आले. पत्रांवर जय भवानी-जय शिवाजी लिहिले होते. शहराच्या विविध भागात आंदोलने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, अमोल पालपल्लीवार,अजहर पटेल,तौसिफ शेख, सुफी टाइगर, सरवर अन्सारी, अनिल बोकडे, शुभम टेकाडे, शहबाज शेख, कमलेश बांगडे, अमित श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement