Published On : Tue, Oct 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

मनसेकडून विधानसभेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर; दक्षिण नागपुरातून आदित्य दुरुगकर यांना उमेदवारी

अमित ठाकरे माहीममधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
Advertisement

Aditya Durugkar

मुंबई:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय कामाला लागले आहे.महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी ४५ नावांची यादी जाहीर केली आहे. मनसेच्या या यादीत दक्षिण नागपुरातून
आदित्य दुरुगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे भाजपच्या मोहन मते यांना दुरुगकर टक्कर देणार आहेत.काँग्रेसकडून विधानसभेसाठी अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेलो नाही. त्यामुळे दक्षिण नागपुरातून काँग्रेस कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या 5 मिनिटांच्या भाषणात राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती.

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘या’ उमेदवारांना मिळाले तिकीट
कल्याण ग्रामीणमधूम राजू पाटील, माहीममधून अमित ठाकरे, दक्षिण नागपुरातून आदित्य दुरुगकर
भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिरीष सावंत, वरळीतून संदीप देशपांडे, ठाणे शहरमधून अविनाश जाधव, मुरबाड मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संगिता चेंदवणकर यांची बदलापूर अत्याचार प्रकरणात लावून धरण्यात निर्णायक भूमिका ठरली होती.पुण्यात कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसर येथून साईनाथ बाबार, खडकवासलातून मयुरेश वांजळे, मागाठाणे येथून नयन कदम, बोरीवलीत कुणाल माईणकर, दहिसर मतदारसंघातून राजेश येरुणकर, दिंडोशीतून भास्कर परब, वर्सोवा मतदारसंघातून संदेश देसाई, कांदिवली पूर्वेतून महेश फरकासे, गोरेगाव येथून विरेंद्र जाधव, चारकोप दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्वेतून भालचंद्र अंबुरे, विक्रोळीत विश्नजित ढोलम, घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्वेतून संदीप कुलथे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Advertisement