Bela: सावंगी खुर्द या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी या गावात घरकुलाची यादी मंजूर करण्यात आली. या यादीत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून स्वतःच्या मर्जीतील लोकांना घरे मंजूर करण्याकरता यादी पंचायत समिती उमरेड येथे पाठविण्यात आली.
गट ग्रामपंचायत सावंगी खुर्द या ग्रामपंचायतीचे अंतर्गत पाच गावांचा समावेश होतो सावंगी खुर्द,बोरी मजरा, बोरगाव, बेलपेठ, आमघाट, या गावांकरिता 15 घरकुल शासकीय कोट्यातून मंजूर करण्यात आली.
पाच गावांना तीन-तीन घरकुले याप्रमाणे घरकुलाचे वाटप करण्यात आले, त्यातही शेतमजूर, भूमिहीन, विधवा,मागासवर्गीय, व अन्य क्रायटेरिया वापरून ही घरे मंजूर करण्यात येतात, सरपंच आणि ग्रामसेवक तसेच ग्राम सदस्य अशी कमिटी मिळून गावातील पाहणी करून गरजू आणि अति गरजू लोकांना घरे मंजूर करण्याकरता प्रस्ताव तयार करून ते पंचायत समितीला पाठवितात, परंतु याच समितीने सावंगी खुर्द येथील सुनंदा सुधाकर गावंडे या भूमिहीन शेतमजूर महिलेचे घर प्रस्तावित यादी मधून वगळले. व ज्या लोकांकडे शेती आहे.
स्वतःचे राहते घर आहे, व अपंगाचा क्रायटेरिया वापरून जे घर मंजूर करण्यात आले ती व्यक्ती लहानपणापासून गाव सोडून गेल्याने त्या व्यक्तीचे नाव सुद्धा मंजूर प्रस्तावित अहवालामध्ये पाठविण्यात आले ही अपंग व्यक्ती बाहेरगावी राहत असून निमशासकीय सेवार्थ आहे. अशीच तक्रार गणेश गावंडे या युवकांनी खंडविकास अधिकारी उमरेड यांचेकडे केली आहे व योग्य आणि गरजू व्यक्तींना घरकुले मंजूर करण्यात यावी याकरता चौकशी करून नव्याने यादी तयार करण्याची विनंती केली आहे.