नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या काळात स्टार प्रचारकांवर मोठी जबाबदारी असते.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, सभा घेण्यासाठी स्टार प्रचारकांचा उपयोग होतो. भाजपा-शिवसेना यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपा-शिवसेनेच्या यादीप्रमाणे NCP च्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आलेला नाही.
दरम्यान भाजपाच्या ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचाही समावेश करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या यादीतही अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नावाचा उल्लेख आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाची नावे-
प्रफुल पटेल
सुनील तटकरे
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
रामराजे नाईक निंबाळकर
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
धर्मरावबाबा आत्रम
अनिल पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
आदिती तटकरे
सुबोध मोहिते
ब्रिजमोहन श्रीवास्तव
के.के शर्मा
सय्यद जलाउद्दिन
बाबा सिद्दिकी
रुपाली चाकणकर
अमोल मिटकरी
सुनील टिंगरे
इंद्रनील नाईक
सुनील शेळके
विक्रम काळे
चेतन तुपे
नितीन पवार
राजेंद्र शिंगणे
दत्तात्रय भरणे
सतीश चव्हाण
उमेश पाटील
समीर भुजबळ
अमरसिंह पंडित
नजीब मुल्ला
सूरज चव्हाण
कल्याण आखाडे
सुनील मगरे
इद्रिस नाईकवडी