नागपूरः महाराष्ट्रात विदर्भास सर्वांत मोठी कुलरची बाजारपेठ आहे. यामध्ये लोकल कुलरची मागणी सर्वाधिक असल्याचे नागपूर टूडेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आर्थिकदृष्ट्या बघितल्यास बँ्रडेड कुलरच्या तुलनेत लोकल कुलरचे भाव निम्मे असून नागपुरी ग्राहकांकडून लोकल कुलरचा असलेली मागणी 70 टक्के आहे.
ऊन तापायला लागल्याने मार्च महिन्यात कुलरच्या मागणीत वाढ झाली आहे. नागपूर टूडे टीमच्या सर्वेक्षणात लोकल कुलर खरेदीचे फायदे दुकानदारांनी सांगितले. हे कुलर नागपुरातील कारखान्यास तयार होत असून निर्मितीखर्च कमी असतो. यात वापरला जाणारा कच्चा माल उच्च दर्जाचा असल्याने ब्रँडेड कुलरच्या तुलनेत लोकल कुलर अधिक दिवस टिकतो. ब्रँडेड कुलर निर्माते ज्याठिकाणी अॅल्युमिनियम कोटेड मशीन वापरत असेल तिथे लोकल कुलरविक्रेते उच्च गुणवत्ता असलेली काॅपर कोटेड मशीन वापरतात. यासोबत ही मशीन जास्त दिवस टिकते. लोकल कुलरमध्ये डेझर्ट कुलरला ग्राहकांची पहिली पसंती आहे. यासह या कुलरमध्ये कोणताही बिघाड आल्यास तो त्वरित दुरूस्त केला जाऊ शकतो. या तुलनेस बँ्रडेड कंपन्यांकडून दिली जाणारी सव्र्हिस कमी दर्जाची आणि उशिराने मिळणारी असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली.
कोरोनावरील निर्बंध हटताच शहरातील कुलर बाजारात नवचैतन्य आले आहे. कुलर व्यवसायिकांना मागील वर्षी मोठे नुकसान सहन करावे लागले होते. सध्या कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने कुलर विक्रीस चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, लोकल कुलर खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे..
नागपूर टुडे टीमने बाजाराचा सव्र्हे केला असता यंदा लोकल कुलरचे मार्केट वीस टक्क्यांनी वधारले आहे. यामध्ये नागपुरच्या लोकल कुलर्सला मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातही मोठी मागणी आहे. यंदा कुलरसाठी लागणाÚया कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहे. यात लोखंड सर्वाधिक महागल्याने कुलरचे भाव वाढले आहे. त्यामुळे कुलर निर्मितीच्या दरातही वाढ नोंदविण्यास आली. नागपुरचा विचार केल्यास येथे मोमिनपुरा, मोठा ताजबाग, खरबी रोड या वस्त्यांमध्ये लोकल कुलर निर्मितीचे सर्वाधिक कारखाने आहेत.
शहरात लोकल कुलरच्या निर्मितीतून 35 टक्के लोकांना किमान 3 महिने रोजगार मिळतो. येथे बँ्रडेडच्या तुलनेत लोकल कुलरचे मार्केट 50 कोटीच्या आसपास आहे. या कुलरची गुणवत्ता चांगली आणि किंमत कमी असल्याने नागपुरकरांसाठी हा उत्तम पर्याय सिध्द होत आहे.