नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस पक्षानेही तयारी सुरु केली अनेक इच्छुकांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. हे पाहता या निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाल्याचे दिसते.
येत्या काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली असून, कामास सुरवात केली आहे. यासोबतच याशिवाय ३८ इच्छुकांची नावेही पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.
नागपुरात काँग्रेसला मिळाला सर्वाधिक विजय –
महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र इथून भाजप नाही तर काँग्रेसने सर्वाधिक विजय मिळवला आहे. मात्र, 2014 मध्ये काँग्रेसचा हा बालेकिल्ला फोडून भाजपला येथून विजय निश्चितच मिळाला होता.
तत्पूर्वी नागपूर मतदारसंघात 1977 मध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर सलग अनेक वर्षे नागपुरातून काँग्रेसचे खासदार निवडून आले. 1980 मध्ये जांबुवंत बापूराव धोटे यांनी पक्षाला येथून विजय मिळवून दिला. 1984 आणि 1989 मध्ये बनवारीलाल भगवानदास पुरोहित यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. मात्र यानंतर बनवारीलाल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 1991 च्या निवडणुकीत बनवारीलाल यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आणि काँग्रेसने दत्ता मेघे यांना उमेदवारी दिली. दत्ता मेघे यांनी काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू ठेवत काँग्रेसला पुन्हा विजयाकडे नेले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार सलग चार वेळा झाले विजयी –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार 1998, 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग चार वेळा खासदार झाले. पण 2014 मध्ये भाजपने नागपुरात पुनरागमन करत मोठा विजय मिळवला. 2014 मध्ये भाजपने माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली. येथून चार वेळा संसदेत पोहोचलेल्या विलास मुत्तेमवार यांचा त्यांनी पराभव केला.
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची यादी –
1. बंटी बाबा शेळके (राष्ट्रिय महासचिव, युवक कॉग्रेस),2 अॅड अशोक बाबुराव यावले (माजी नगरसेवक), 3. जयंत आनंदराव दळवी (उपाध्यक्ष, ना. जि. ग्रामिण काँग्रेस),4 राजेश बापुरावजी काकडे(काँग्रेस कार्यकर्ता) 5. सुरेश बाबुरावजी वर्षे (काँग्रेस कार्यकर्ता) 6.मनोहर वासुदेवराव थुल (काँग्रेस कार्यकर्ता),7. ज्ञानेश्वर ओंकारराव ठाकरे(ब्लॉक अध्यक्ष पूर्व नागपूर ) 8.अशोक धवड (माजी आमदार )9 श्री रवि विठठलराव पराते (हलबा समाज काँग्रेस कार्यकर्ते )10 श्री रवि जी. सोमकुवर (काँग्रेस कार्यकर्ता), 11 श्री. सरफराज खान जफरुल्लाह (काँग्रेस कार्यकर्ता) 12 श्री. फिरदोस अंजुम सरफराज खान (काँग्रेस कार्यकर्ता) 13 श्री सुनिल विष्णु ढोले (काँग्रेस कार्यकर्ता) 14 सौ. निलु सुनिल ढोले (काँग्रेस कार्यकर्ता) , 15 सौ. संध्या रमेश ठाकरे (काँग्रेस कार्यकर्ता). 16 श्री. प्रफुल विनोदजी गुडधे( प्रदेश प्रतिनिधी , 17 प्रा. अशोक भड 18. प्रा. हरीश पतिरामजी खंडाईत 19. इंजि. नितिन मारोतराव कुंभलकर,20 श्री.आप्पा साहेब भाउसाहेब मोहिते,21. श्री रमन ईश्वरसिंह पैगवार 22. श्री संजय राम हेडाऊ 23. श्री.धनंजय वसंतराव धार्मिक,24 . श्री. अन्नाजी मारोतराव राऊत,24 श्री. अन्नाजी मारोतराव राऊत 25. श्री चंद्रशेखर प्रभाकर पौनिकर 26. श्री दिलीप शेषराव वाकळे 27. नयना संजय झाडे 28. श्री. प्रमोद रुपचंद चिंचखेडे 29. श्री मयुरेश धनराज येरपुडे 30. सौ आशा नेहरु उईके 31. एड. शिरीष बद्रीप्रसाद तिवारी 32. श्री रंजन हरीहरराव नलोडे 33. श्रीमती संगिता तलमले 34. श्री राजेश व्ही. महाजन 35. डॉ. गजराज पाडुरंगजी हटेवार 36.सौ.शंकतुला शिवाजी धार्मिक 37.श्री सोनु सुकुल साहू 38. श्री सोनु सुकुल आदी इच्छुकांची नावे आहेत.