नागपूर:लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलेल्या महाराष्ट्रामध्ये मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे.यात नागपूर मतदरसंघातून नितीन गडकरी 11019 मतांनी आघडीवर आहे.या मतदरसंघात गडकरी विरोधात काँग्रेस नेते विकास ठाकरे रिंगणात उतरले होते.लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपाने २८, शिवसेना शिंदे गटाने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४ आणि रासपने १ जागेवर निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने २१, काँग्रेसने १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढवली होती.
नागपूर –
नितीन गडकरी – 40,644
विकास ठाकरे – 29625
गडकरी 11 हजार मतांनी पुढे