नागपूर : देशभरात आज १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळाली.
नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. चौथ्या फेरीत हाती आलेल्या आकडेवारीनुसार नितीन गडकरी यांना १,८८०१५ इतकी मते मिळाली असून विकास ठाकरे यांना १,५०१५२ इतकी मते मिळाली आहेत. गडकरी सध्या ३७,८६३ मतांनी आघाडीवर असून विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत.
दरम्यान लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीकडून भाजपाने २८, शिवसेना शिंदे गटाने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ४ आणि रासपने १ जागेवर निवडणूक लढवली होती.
तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने २१, काँग्रेसने १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १० जागांवर निवडणूक लढवली होती.