Advertisement
चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीतील आकडेवारी समोर आली आहे. पाच फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 61 हजार 760 मतांनी आघाडीवर आहे. त्यांना एकूण 1 हजार 46 हजार 272, तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 84 हजार 512 मते मिळाली.
चंद्रपूर मतदारसंघात वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली.