नागपूर : लोकसभा निडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.पहिल्या टप्प्यासाठी आज २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ मार्च आहे. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी २८ मार्च रोजी होईल.
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मदान होणार आहे.
रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे.
दरम्यान २१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक १०२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश असून राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.