Published On : Fri, Apr 19th, 2024

लोकसभा निवडणूक;नागपुरात मतदानाला सुरुवात, सरसंघचालकांनी केले मतदान,नागरिकांनाही केले आवाहन

Advertisement

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केले. महाल येथील भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानचा हक्क बजावला. भागवत यांच्या सोबतच नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी देखील मतदान केले.

Advertisement

संघाच्या परंपरेनुसार दर निवडणूकीत सरसंघचालक सर्वात अगोदर मतदानकेंद्रावर पोहोचतात व यावर्षीदेखील ही परंपरा त्यांनी कायम ठेवत सकाळीच मतदान केले.मतदान आपला अधिकार व कर्तव्य आहे. १०० टक्के मतदान झाले पाहिजे व त्यासाठीच मी आज सर्वात अगोदर मतदानाचेच कर्तव्य पार पाडले.मोहन भागवत यांनी नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आ‌वाहन केले.

‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला –
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेस सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे अशी थेट लढत होत आहे. तर जिल्ह्यातील दुसऱ्या म्हणजेच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे असा सामना होत आहे.