नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 9 वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने आपला हा निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज आपला निर्णय सुनावत सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने मात्र जामिनाला विरोध केला होता. पुरोहित यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा असे एनआयएचे म्हणणे होते.