Advertisement
चंदीगड: पंजाबमधील लुधियाना येथे गॅस गळतीची मोठी घटना घडली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत . जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यामार्फत बचाव कार्य सुरू आहे.
लुधियानातील ग्यासपूर परिसरात ही घडली असून गोयल किराणा असे गॅस गळती झालेल्या दुकानाचे नाव आहे.
या घटनेनंतर नागरिकांची एकच खळबळ उडाली. गॅस गळती झाल्यामुळे अनेक नागरिक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा पोलिसांकडून तपास घेण्यात येत आहे.