Published On : Fri, Feb 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महा मेट्रोने स्थापित केला इतिहास : ८०० टन वजनाचे स्ट्रकचर रेल्वे ट्रॅकवर लॉंच

Advertisement

नागपूर : तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत असून शुक्रवारच्या मध्यरात्री भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८० मीटर लांब व ८०० टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच केले असून नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली आहे.

गर्डर लॉंचिंग होताच रेकॉर्ड झाले स्थापित :
•भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८०० टन वजनाचे स्टील गर्डर स्थापित होणे हा अनोखा रेकॉर्ड आहे.
•देशात पहिल्यांदाच १६५० टन क्षमतेचे निर्माण कार्य शहरी भागात करण्यात येत आहे.
•आज स्थापित करण्यात आलेल्या ८०० टन वजनाच्या स्टील गर्डरला ३२००० एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला असून संपूर्ण स्ट्रकचरला ८०००० बोल्टचा वापर केल्या जात आहे.
•जमिनीपासून सध्यास्थितीत असलेल्या स्टील गर्डरची उंची ३२ मीटर एवढी आहे.
•रेल्वेच्या इतिहासात प्रथमच २२ मीटर रुंद स्टील गर्डर स्थापित करण्यात आला.
•देशात पहिल्यांदा ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था स्थापित केल्या जात आहे.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महा मेट्रोने निर्माण कार्यादरम्यान अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड स्थापित केले असून या रेकॉर्डची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लॉंच करण्यात आले व नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली असून प्रिसिजन इज ऍट इट्स हाईट (precision is at its height) निश्चितच म्हणता येईल. रेल्वे ट्रॅकच्या वर एवढे मोठे स्ट्रकचर योग्य नियोजन व टीम वर्कने स्थापित करने ही मोठी बाब आहे.

भारतात पहिल्यांदाच ४ स्तरीय वाहुतुक व्यवस्था नागपूर शहरात निर्माण केल्या जात असून आव्हानात्मक अश्या रेल्वे ट्रॅकच्यावर सुमारे ४.३० तासाचा रेल्वे ब्लॉक घेऊन सदर कार्य पूर्ण करत महा मेट्रोने मैलाचा दगड स्थापित केला आहे.

महा मेट्रोने भारतीय रेलवे कडून पूर्ण कार्याकरिता एकूण २४ तासाचा ब्लॉक मागितल्या गेला असून या पूर्वी ८ तासांचा ब्लॉक टप्या-टप्य्या मध्ये घेण्यात आला व आज गर्डर स्थापित करतांना ४.३० तासाचा ब्लॉक घेण्यात आला होता. १६५० टन वजनाचे स्ट्रकचर शहरी भागात प्रथमतः स्थापित झाल्याचे बघता सदर स्ट्रकचरची नोंद ऐतिहासिक अश्या पुरस्कारा करिता नोंदविल्या जात आहे.

डॉ.ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,महा मेट्रो : महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गड्डीगोदाम (गुरुद्वारा) रेल्वे ट्रॅकच्यावर कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या पश्चात्तच डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो कामगार तसेच अधिकाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

उल्लेखनीय आहे कि, या स्टील गर्डरचे लॉंचिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रिच – २ (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) चे निर्माण कार्य देखील पूर्ण झाले आहेत तसेच उर्वरित कार्य लवकर पूर्ण करून जमिनिस्तरावरील रस्ता,उड्डाणपूल व मेट्रो सेवा नागरिकांकरिता खुला होणार असा विश्वास महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. डबल डेकर पुलाचे निर्माण कार्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महा मेट्रोकडे सोपविले आहे.

देशात पहिल्यांदाच मोठे आणि जड अशी ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण केल्या जात असून सदर निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्तअश्या रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी(RuB) येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे .

महा मेट्रोने निर्माण कार्याच्या सुरुवातीपासूनच अनोखे निर्माण कार्य करत शहराच्या विकासात भर घातला असून ज्यामध्ये वर्धा मार्गावर डबल डेकर उड्डाणपुल, आनंद टॉकीज येथे निर्माण केलेले बॅलन्स कॅटीलीव्हर, सिताबर्डी येथे गर्दीच्या ठिकाणी उभारललेले इंटरचेंज मेट्रो स्टेशन व झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन या ठिकाणी आधुनिक असे निर्माण कार्य करत शहराला एक नवी ओळख प्रदान केली आहे या मध्ये आणखी भर घालत कामठी मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे.

या कामाकरिता भारतीय रेल्वेचे मुख्य पूल अभियंता,विभागीय रेल प्रबंधक (मध्य रेल्वे), अतिरिक्त विभागीय रेल प्रबंधक (इन्फ्रा – मध्य रेल्वे),अतिरिक्त विभागीय रेल प्रबंधक (ऑपरेटिंग – मध्य रेल्वे),वरिष्ठ विभागीय परिचालन प्रबंधक,वरिष्ट विभागीय अभियंता,वरिष्ट विभागीय अभियंता (सेंट्रल) यांनी या कामाकरिता मौलाचे सहकार्य केले.

या लोखंडी स्ट्रकचरची जमिनीपासून उंची २४ मीटर असून स्टील गर्डरची उंची ३२ मीटर व लांबी ८० मीटर व रुंदी १८ मीटर एवढे आहे व याचे एकूण वजन १ हजार ६५० टन इतके आहे. स्ट्रकचर उभारणी करतांना सुमारे ८०००० एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात येणार आहे.

या स्टील गर्डर करिता लागणारी आवश्यक सामुग्री एकत्रित व फेब्रिकेशनचे कार्य सप्टेंबर २०२१ पासून बुटीबोरी येथे सुरु करण्यात आले तसेच सडक मार्गाने बुटीबोरी येथून गड्डीगोदाम या ठिकाणी ट्रेलरच्या साहाय्याने आणल्या गेले. १६५० टन क्षमता असलेले स्टील गर्डर ई-३५० ग्रेडचे असून आरडीएसओ (अनुसंधान डिजाइन आणि मानक संगठन) यांनी ठरविलेल्या मानकानुसार तयार करण्यात आले आहे.

*अश्या प्रकारे रेल्वे ट्रॅकच्या वर स्टील गर्डर स्थापित करण्यात आला:*
वर दिलेल्या चलचित्रानुसार रेल्वे ट्रॅकच्या वर कार्य क्रमांक ०१ ते ०७ मध्ये दिलेल्या नुसार पूर्ण झाले. ज्यामध्ये सदर स्टील गर्डर दर मिनिटाला ३० से. मी. ने पुढे सरकला.

Advertisement
Advertisement