नागपूर: कामठी मार्गावरील नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय समोर तयार होत असलेले महा मेट्रो नागपूरचे ‘कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन’ कस्तुरचंद पार्क थीम वर आधारित आहे. शहरात कस्तूरचंद पार्क हे एक ऐतिहासिक वारसा असलेले प्रसिद्ध स्थळ आहे.
ही ओळख मेट्रो स्टेशनला देण्यात यावी यासाठी एनिया फ्रेंच आर्किटेक्त्तच्या साह्याने या स्टेशनचे बांधकाम होत आहे. कामठी कडे जाणाऱ्या महामार्गावर एल्हिवेटेड सेक्शनवर हे स्टेशन राहील. स्टेशनमध्ये प्रवेश आणि निर्गमन करण्याचा मार्ग कस्तुरचंद पार्क मैदानातुन राहील.
या मार्गावर सदर, सीताबर्डी, गड्डीगोदाम आणि रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. आवागमन साठी वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्याचे सुयोग्य व्यवस्थापन महा मेट्रो तर्फे करण्यात आले आहे. याठिकाणी महा मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी रात्र-दिवस कार्य करीत आहेत.
स्टेशनजवळील ७ हजार २०० चौरस मीटर जागेवर महा मेट्रोद्वारे २१ मजलीची भव्य इमारतीचे निर्माण कार्य सुरु आहे.
याचे देखील बांधकाम वेगाने पूर्ण केले जात आहे. कस्तुरचंद पार्कच्या नावाने ही इमारत ओळखल्या जाईल. स्टेशनचा पायवा (प्लिंथ) तयार करण्यात आला असून यात पाइल्स, पियर, पियर कॅप बसविण्याचे कार्य पूर्ण झाले असून आता कॉनकोर्स लेवल वरील पियर आर्मचे कार्य निर्माणाधीन आहे. इमारतीच्या पहिल्या तीनही मजल्यावर पार्किंगची सुविधा असेल. तब्बल १२०० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे.
स्टेशनचे एकंदर कार्य आणि स्टेशनजवळील इमारतीचे कार्य पूर्ण झाल्यानंतर हे स्टेशन नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. एकूणच २१ मजलीची ही इमारत आणि या इमारतीपासून १ कीमी अंतरावर निर्माणाधीन २० मजलीचे झिरो माईल मेट्रो स्टेशन असे हे दोन्ही मेट्रो स्टेशन शहराच्या आधुनिक विकासाची साक्ष देणारे ठरेल.