Published On : Tue, Apr 20th, 2021

महा मेट्रो : सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक दरम्यानचे कार्य जलद गतीने सुरु

नागपूर: महा मेट्रोच्या सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक रिच-२ कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून आता पर्यत (७८% व्हायाडक्ट आणि ७०% स्टेशनचे) कार्य पूर्ण झाले आहे.तसेच या मार्गिकेवर ट्रॅक टाकण्याचे कार्य जलद गतीने सुरु झाले. मुख्य म्हणजे रिच – २ कामठी महा मार्गावर मेट्रो रेल व्हायाडक्ट आणि स्टेशनच्या निर्माण कार्या सोबतच डबल डेव्कर उडाणपूलाचे निर्माण कार्य देखील गतीने सुरु आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – २ अंतर्गत ४ स्तरीय संरचना असलेली परिवहन व्यवस्था आहे. या मार्गावरील मेट्रो मार्गिका सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक मेट्रो स्टेशन पर्यत ७.३० कि.मी. रुंदी आहे. यामध्ये झिरो माईल, कस्तुरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि आटोमोटीव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :
पायलिंग १६८२ पैकी १६८२ , पाईल कॅप २२१ पैकी २२१,पियर २२१ पैकी २१९, पियर कॅप २२१ पैकी २१९, सेग्मेंट कास्टिंग २३२० पैकी २३२०, स्पॅन इंरेव्कशन २२० पैकी १९३,स्पाईन इरेक्शन १६८ पैकी १४१, पियर आर्म (एनएचएआय लेव्हल) ३३ पैकी ३३,पियर आर्म (मेट्रो लेव्हल) ३३ पैकी ३३ झाले असून निर्माण कार्य जलद गतीने सुरु असून डिसेंबर २०२१ पर्यंत या मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.

रिच-२(सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक):
रिच-२(सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक) कॉरीडोरचे गतीने सुरु असून आता पर्यत ७८ % व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये झिरो माईल ९९%,कस्तुरचंद पार्क ९५%,गड्डीगोदाम चौक ७०%,कडबी चौक ५५%, इंदोरा चौक ५०%, नारी रोड ८०% आणि आटोमोटीव्ह चौक ९०% मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – २ अंतर्गत गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर तिसर्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील. सध्याची वाहतूक कोंडी लक्षात घेता ४ स्तरीय बांधकाम कार्य काळाची गरज आहे. कामठी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाहनांची ये-जा येथून अविरत सुरुच असते. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कॉलेज, व्यापारी संकुले,बँक,शासकीय कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहेत. तसेच हा रस्ता उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. तसेच या मार्गावर रिजर्व बँक ऑफ इंडीया, कस्तुरचंद पार्क, सिताबर्डी किल्ला अश्या प्रमुख आणि ऐतिहासिक स्मारक आणि संस्थाने आहेत.

डबल डेकर प्रकल्पाचे प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे :

•प्रस्तावित उड्डानपूल आणि मेट्रो ट्रॅकज्याला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजे या २ संरचनेचे निर्माण कार्य एका सिंगल पिलर वर होणार आहे. ज्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल.
•उड्डानपूल संरचना एलआयसी चौक येथून सुरु होणार असून आटोमोटीव्ह चौक पर्यत कामठी रोड अश्या व्यस्त मार्गावर आहे.
•४ स्तरीय वाहतूक प्रणाली पुढील प्रमाणे : १.) कामठी रोड, २.) नागपूर-भोपाळ रेल्वे लाईन, ३.) उड्डानपूल, ४.) मेट्रो व्हायाडव्ट
•मेट्रो व्हायाडव्टची सर्वात जास्त उंची गड्डी गोदाम येथील गुरुद्वारा जवळ असले ज्याठिकाणी रेल्वेमार्ग रस्त्यावरून जात आहे.
•उड्डनपुलाची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून १४.९ मी. एवढी असेल.
•तसेच मेट्रो व्हायाडव्टची सर्वात जास्त उंची रस्त्यावरून २४.८ मी. एवढी असेल.
•तिसऱ्या स्तरावरील उड्डानपूल चार पदरी वाहतुकी करीता असेल ज्याची रुंदी ७.५० मीटर प्रत्येकी एवढी राहणार.
•रिच -२ मार्गिकेवरील ५.३ कि.मी.(आटोमोटीव्ह चौक ते एलआयसी चौक) इतका भाग डबल डेव्कर उड्डानपूलाचा आहे. तिसऱ्या स्तरावरील उड्डानपूल चार पदरी वाहतुकी करीता असेल ज्याची रुंदी ७.५० मीटर प्रत्येकी एवढी राहणार. तांत्रिकी दृष्ट्या बघता १४०० मेट्रिक टन वजनाचे स्टील कंपोझीट ट्रस गर्डर रेल्वे ट्रॅकच्यावर योग्य लौचिंग पद्धतीने ठेवल्या जाईल. स्टील कंपोझीट ट्रस गर्डरचे वजन १४०० मेट्रिक असून ८०मी. स्पॅन एवढा आहे. आरओबीची संरचनामध्ये पाईल फाउंडेशन,पियर्स आणि पोर्टल बीम व सुपर स्ट्रक्चर स्टील कंपोझीट ८० मी. स्पॅन ट्रस गर्डर चा समावेश आहे. आरओबी(RoB) ची उंची रस्त्यावरून २५ मी. एवढी आहे.

Advertisement