नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार यावरून अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत.
गेल्या 10 वर्षात भाजपा सरकारने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत.
महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा मोठा दावा पटोले यांनी केला आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत.मात्र महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहावे. त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा, अशी टीका पटोले यांनी केली.