नागपूर: शुरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंती व शौर्य दिवस प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन्स स्थित म.न.पा. मुख्यालयातील महाराणा प्रताप यांच्या तैलचित्रला महापौर नंदा जिचकार व आमदार सुधाकर देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरीया, माजी उपमहापौर ज्येष्ठ नगरसेवक सुनिल अग्रवाल, नगरसेवक सर्वश्री निशांत गांधी, जगदीश ग्वालबंशी, जितेंद्र घोडेस्वार, जि.प. सदस्या रोशन ठाकुर, महाराणा प्रताप स्मारक समन्वय समितीचे सर्वश्री ठाकुरसिंह बैस, माताप्रताप सिंग बैस, प्रतापसिंग चव्हाण, प्रमोदसिंग ठाकूर, सुरजीतसिंग गरवार, किसन गावंडे, राजेश जोशी, ठाकुर किशोरसिंग बैस तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
यानंतर महापौर कक्षात जयंती निमित्त व “शौर्य दिवसा” प्रित्यर्थ झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आ. सुधाकर देशमुख म्हणाले की, मेडीकल हॉस्पीटल जवळील टी.बी. दवाखनाजवळ महाराणा प्रताप स्मारक समन्वय समितीची जागा उपलब्ध आहे या जागेवर म.न.पा. तर्फे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी म.न.पा.नी पुढाकार घेवून निधी उपलब्ध करून दयावे अशी महापौराना सूचना केली.
यावेळी मार्गदर्शन करतांना मा. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या महाराणा प्रताप स्मारक समन्वय समितीने जागा उपलब्ध करुन दिल्यास स्मारक व पुतळा निर्माण करण्यास म.न.पा. पाठपुरावा करणार आहे व निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. शहरात महाराणा प्रताप सारख्या थोर वीर पुरुषाचे स्मारक व पुतळा निर्मिण झाले तर शहराचा गौरव वाढणार आहे व तो आम्हा सर्वांन साठी प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी महाराणा प्रताप स्मारक समन्वय समितीतर्फे महापौर नंदा जिचकार, आ. सूधाकर देशमुख व माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक सुनिल अग्रवाल व इतर मान्यवराचा गौरव करण्यात आला.