Advertisement
नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय वन्यजीव उद्यानात आफ्रिकन सफारी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने उद्यानासाठी ५१३ कोटी रुपये दिले आहेत.
त्यानंतर लवकरच उद्यानाचे काम सुरु होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जाणार आहे. 2016 मध्ये गोरेवाड्यात आफ्रिकन सफारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सध्या येथे भारतीय सफारी सुरू आहे. मात्र, 2019 नंतर हे काम बंद पडले.
दरम्यान गोरेवाड्यात 35 आफ्रिकन प्राणी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये लेमूर, मीरकट, आफ्रिकन जंगली कुत्रा, कुडू, इंपाला, शहामृग, हिप्पोपोटॅमस, जिराफ, झेब्रा, बबून, चिंपांझी, आफ्रिकन सिंह यांचा समावेश आहे.