Published On : Wed, Jan 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे म्हणते मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Gold Rate
Friday 28 Feb. 2025
Gold 24 KT 85,400 /-
Gold 22 KT 79,400 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

.अशोक सराफ यांचे चित्रपटअशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत या चित्रपटांमधील अशोक सराफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. करण अर्जुन, सिंघम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केले. इतकेच नाही तर भोजपुरी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.

Advertisement