पुणे : आज सीबीएसीचा १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च का कालावधीत मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharshtraeducation.com
4. Http://www.knowyouerresult.com
5. hscresult.mkcl.org
6. http://jagranjosh.com
7. www.bhaskar.com
या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना हा निकाल बघता येणार आहे.