जळगाव: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशन मुंबईच्या सन २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीत २१ पैकी ७ जागा बिनविरोध निवडून आल्या. यात पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील व जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह हाउसिंग फायनान्स मुंबईच्या सन २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी संचालकांच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यात गुरुवारी ७ जागांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक विभाग मतदारसंघातून आमदार डॉ. सतीश पाटील (जळगाव), आमदार बाळासाहेब सानप (नाशिक), माजी आमदार वसंत गीते यांची तसेच विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी संचालक विजय रामदास पाटील (जळगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सोबत पुणे विभागीय मतदारसंघातून सागर उल्हास काकडे (पुणे), अॅड. ललित अरविंद चव्हाण (वाई-सातारा) व व्ही. बी. पाटील यांची निवड करण्यात आली. उर्वरित १४ जागांसाठी राष्ट्रवादीच्या ५ तर भाजपच्या २ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.