Published On : Fri, Dec 8th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राला एव्हीएशनचा फायदा झालाच पाहिजे लवकरच पॉलिसी तयार केली जाईल; देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन
Advertisement

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिहानमधील इंडामेर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्राला एव्हीएशनचा फायदा झालाच पाहिजे लवकरच पॉलिसी तयार केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

एव्हीएशन हे विशाल क्षेत्र आहे. हे क्षेत्र अतिशय वेगाने वाढत आहे.त्यामुळे महाराष्ट्रासाठी लवकरच एव्हिएशन पॉलिसी तयार केली जाईल,नागपूरच्या वाटचालीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. याठिकाणी हेलिकॉप्टरचे प्रत्यक्ष उत्पादनही सुरू करण्याचा मानस आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Gold Rate
03 April 2025
Gold 24 KT 91,900 /-
Gold 22 KT 85,500 /-
Silver / Kg 98,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एमआरओमुळे नागपुरात हेलिकॉप्टरची फार मोठी इकोसिस्टीम तयार झाली आहे. हेलिकॉप्टरचा उपयोग जगामध्ये मोठ्या प्रमाणात मेडिकल सर्विसेस, पर्यटन, कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी होत आहे. एव्हिएशन पॉलिसीमध्ये या सर्व बाबींचा समावेश राहील, असे विधानही फडणवीस यांनी केले.

Advertisement
Advertisement