कोच्ची (केरळ) – महाराष्ट्र पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमठवत संपूर्ण देशात महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. कोच्ची येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रथम अखिल भारतीय बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर स्पर्धा 2024-25 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या खेळगुणांचे दर्शन घडवत देशभरातील पोलीस खेळाडूंमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ही कामगिरी केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
स्पर्धेमधील विजेते पोलीस खेळाडू आणि त्यांची पदके खालीलप्रमाणे –
– AD SP संजय तुंगार (नांदेड, ACB) – सुवर्णपदक (50+ वयोगट, बॅडमिंटन
– HC हर्षदीप खोब्रागडे (नागपूर सिटी) – कांस्यपदक (40+ डबल्स, टेबल टेनिस
– HC मिलिंद लोणे (नांदेड सिटी) – कांस्यपदक (50+ वयोगट, बॅडमिंटन
– PSI शैलेश शिंदे (मुंबई) – कांस्यपदक (40+ डबल्स, टेबल टेनिस)
-HC गौसखान पठाण (परभणी) – कांस्यपदक (Open Mixed Doubles
– WHC सुषमा लोखंडे (नांदेड) – कांस्यपदक (Open Mixed Doubles)
– WPC भाग्यश्री मेसरे (अकोला) – कांस्यपदक (Open Doubles)
-PC अभिनव वाघाडे (वाशीम) – कांस्यपदक (Open Doubles)
या सर्व विजेत्यांचे महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने तसेच सर्व राज्यवासियांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि क्रीडा कौशल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ही कामगिरी राज्यातील तरुण पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल यात शंका नाही. पोलीस दल केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्टतेचा प्रत्यय देत आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.