Advertisement
बुलडाणा : समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. काल मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात घडला . हा अपघात इतका भीषण होता की आगीत कार जळून खाक झाली. यात कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात झालेली कार नागपूर शिर्डीला निघाली होती. बुलडाण्यातील देऊळगाव पोळ या गावाजवळ कारला अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर कारला अपघात होऊन ती सुरुवातीला इम्पॅक्ट बॅरियरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर कारला आग लागली. या आगीत होरपळून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आगीत जळाल्याने अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.अपघातातील जखमीवर दुसरबीड रुग्णालयात उपचार सुरू आहे.