
Two beach chairs on the tropical sand beach
सलग तीन आठवडे वीकेण्डला धरून सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. मधले एक वा दोन दिवस रजा घेऊन सलग ५ ते ६ दिवसांचे सुट्ट्यांचे नियोजन करता येणार आहे.
४ ऑगस्टला सुट्टी घेतली तर पुढचे ५ ते ७ ऑगस्टपर्यंतचे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळून ४ दिवसांचा प्लान करता येणार आहे. त्यापुढील सलग आठवड्यात १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार, १४ ऑगस्टला जन्माष्टमीला सुटी घेतल्यास १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, त्यानंतर १६ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास १७ ला पतेतीची सुट्टी अशा सलग ६ दिवसा सुट्ट्या मिळणार आहेत.
त्यापुढील आठवड्यात पुन्हा २५ ऑगस्टला शुक्रवारी गणेशोत्सव आणि त्यापुढे शुक्रवार, शनिवार अशी लागून सुट्टी घेता येऊ शकेल