Advertisement
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत असून नव्या सरकारच्या पहिला अर्थसंकल्प आज १० मार्च सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवारांकडून सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही.उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी शासन प्रयत्नशील असल्याने मोठी गुंतवणूक राज्यात होत आहे,असे अजित पवार म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.
शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे देशी आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यामुळे रोजगार वाढत असून उत्पन्नात वाढ होत असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली.