Published On : Fri, Jan 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र आता थांबणार नाही, परदेशी गुंतवणुकीत राज्य अव्वल स्थानी;देवेंद्र फडणवीसांचे विधान

Advertisement

मुंबई : परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी असून सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

महाराष्ट्र आता थांबणार नाही. वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के एफडीआय अवघ्या ६ महिन्यांत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १,१९,५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे.

मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो… माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो, अशी पोस्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Advertisement