Advertisement
नागपूर: रणांगण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संत्रानगरीत आलेला सिनेअभिनेता सर्वांचा लाडका स्वप्नील जोशी नागपूर मेट्रो चे काम पाहून भारावला, आणि आतापर्यंतचे सर्वात जलद गतीने पूर्ण होणारे काम म्हणून त्याने माझी मेट्रो चे तोंडभरून कौतुक केले. यावेळी मेट्रोची रिप्लिका असलेले झिरो माईल स्थित माहिती केंद्राची पूर्ण पाहणी करत त्याने उत्साहाने फोटोसेशनही केले.