Published On : Fri, Mar 1st, 2024

महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला.. उद्धव ठाकरे, शरद पवार गटासह काँग्रेसला मिळणार इतक्या जागा!

Advertisement

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. या निवडणुकीकरिता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून त्यानुसार उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेससह घटक पक्षांना जागावाटप करण्यात येणार आहे.महाविकास आघाडीकडून विशेषतः 48 पैकी 8 जागेवर तिढा आहे.

हा तिढा सुटल्यानंतर दोन दिवसातच जागावाटपाची आधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या बैठकीत 21 -15 -9 या फॉर्म्युल्या ठरला आहे. यामध्ये एकादी दुसरी जागा कमी जास्त होऊ शकते. शिवसेना ठाकर गटाला 21 काँग्रेसला15, शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळणार आहेत. यामधील दोन जागा वंचित आघाडीला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या 8 जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे.

Advertisement

महाविकास आघाडीमध्ये अजूनही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट काही जागांसाठी आग्रही आहेत. वंचित बहुजन आघाडीला यामध्ये आणखी किती जागा द्यायच्या? यावर चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी 2 जागा मविआ सोडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मविआच्या बैठकांचे सत्र सुरु असून, कालच्या बैठकीनंतर वंचित आघाडीने महाविकास आघाडीकडे 27 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला, जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे.

जागावाटपाबाबत यापुढे बैठक होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत काल शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर गेले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित होते.