नागपूर: राज्यात निर्माण झालेल्या वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला वीज बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनला महावितरणने तात्काळ प्रतिसाद देत वीज बचतीची शपथ घेऊन त्यानुसार वीज बचत सुरु केली.
दोन दिवसापूर्वी ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनते सोबतच शासकीय कार्यालयांना वीज बचतीचे आवाहन केले होते. या नुसार आज महावितरण नागपूर परिमंडळातील अनेक कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वीज बचतीची शपथ घेतली.
मंडळ कार्यालय, विभागीय कार्यालय, उपविभागीय कार्याला येथे आयोजित कार्यक्रमात शपथ घेऊन अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने गरज नसेल त्या वेळी विजेचा वापर करणे बंद केले.
मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, नागपूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे, काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ, काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी , आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड , वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता यु. एम. उरकुडे, हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी शाखा कार्यालयातील जनमित्र आणि उपकेंद्रात यंत्र चालकांना वीज बचतीचे महत्व समजवून सांगितले
या शिवाय एसएनडीएल कंपनी कडून देखील उर्जाबचतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला.