Advertisement
नागपूर:- प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय करुन देणारे आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करणा-या रामायण या महाकाव्याचे रचनाकार, आदिकवि महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या विद्युत भवन या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.