Published On : Wed, Aug 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात महविकास आघाडीचे सरकार पुन्हा स्थापन होणार;अंतर्गत सर्व्हेतून उघड

Advertisement

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महविकास आघाडीचा अंतर्गत सर्व्हे समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सर्व्हेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात 13 जागा निवडून आणल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढवली. महाविकास आघाडीच्या सर्व्हेनुसार सर्वाधिक म्हणजे 80-85 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर सर्वात कमी म्हणजे 30-35 जागा ठाकरे गटाला मिळण्याचा अंदाज आहे.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg - 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 55-60 जागा मिळण्याची शक्यता आहे. हा अंतर्गत काँग्रेस पक्षाचा सर्व्हे असल्याचे समोर येत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार येणार सत्तेत – दुसरीकडे महायुती मध्ये 60-62 जागा भाजपला, शिंदे गटाला 30-32 तर अजित पवार गटाला 8-9 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेतून किमान 160-170 जागा महाविकास आघाडीला मिळतील.तसेच राज्यात आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement