नागपूर : दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी ओंकार महेंद्र तलमले याने नोकरीचे आमिष दाखवून १११ तरुणांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आतापर्यंतची सर्वात मोठी फसवणुकीची घटना असून यातून आरोपीने ५ कोटी रुपये मिळवल्याची माहिती आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, नागपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
माहितीनुसार ,नागपुरातील दत्तवाडी येथे राहणारा ओंकार महेंद्र तलमले याने स्वत:ला नासामधील जेआर सायंटिस्ट म्हणवून नागपुरातील आरआरएससी (रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर) या केंद्रात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती.
नागपूर पोलिसांनी ओंकार महेंद्र तलमले याच्याविरुद्ध बजाज नगर पोलिस ठाण्यात 420, 406, 435, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान व्यावसायिक निराला सिंग आणि अंबरीश गोळे यांच्या खून आणि दरोड्याप्रकरणी ओंकार महेंद्र तलमले आणि त्याच्या 5 साथीदारांना नागपूर पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे .याच दरम्यान फसवणुकीचे हे प्रकरण समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.