नागपूर : २०१५ साली मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला सुरूवात झाल्यानंतर नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजला लोकांची खास पसंती मिळाली. प्रकल्पाचे विविध ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामाचे छायाचित्र नागपूरकर उत्साहाने पाठवू लागले. जसजसे प्रकल्पाचे काम वाढत गेले तसतसे नागरिकांचा उत्साह देखील वाढत गेला. अतिशय सुदंर छायाचित्रे नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवर मिळू लागले. चाहत्यांतर्फे मिळणारे छायाचित्रे दर शनिवारी प्रदर्शित होत गेल्याने लोकांचा उत्साह आणखी वाढू लागला.
नागरिकांची प्रकल्पाविषयीची आत्मीयता व सहकार्य लक्षात घेता ‘माझी मेट्रो फोटोग्राफी कॉन्टेस्ट’ स्पर्धा सुरु करण्याची संकल्पना समोर आली. छायाचित्रांचे कौतुक व्हायला हवे आणि छायाचित्रकारांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून ही स्पर्धा सुरु करण्यात आली. प्रत्येक महिन्यासाठी ही स्पर्धा राबविली जात असून यात १ विजेता आणि ५ प्रोत्साहन पुरस्कार महिन्याच्या २५ तारखेला विजेत्यांचे नावासह घोषित करण्यात येते. गेल्या तीन महिन्यासाठी झालेल्या फोटोग्राफी स्पर्धेला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून तब्बल ३०० च्या वर आकर्षक छायाचित्रे स्पर्धेसाठी प्राप्त झाले.
निवडकरण्यात आलेले १५ आकर्षक छायाचित्रे बघण्यासाठी महा मेट्रोने आपल्या वेबसाईट http://metrorailnagpur.com / photography / index.html या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे.
भविष्यात देखील ही स्पर्धा अशीच सुरू राहणार असून यात जास्तीत जास्त नागपूरकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महा मेट्रोने केले आहे.
१ एप्रिल २०१८ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेअंतर्गत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. एप्रिल, मे आणि जून महिन्यासाठी प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे अभिनव फटिंग, रिषभ पालीवाल आणि तुषार सूर्यवंशी. तसेच तिन्ही महिन्याचे प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांची नावे अनुक्रमे रोशन टिंगने, रुपेश बत्तासे, सुचानंदन सिंघा, वैभव साठवणे, अक्षय पाटील, कार्तिक मुदलियार, कृष्णकांत शर्मा, निनाद बोकडे, परीक्षित हारसोले , रिकार्डीओ स्टेफन्स, तेजिंदर सिंग रेणू, केतन चावजी, चंद्रकांत मर्चंटवार, निशांत महात्मे, सिद्धार्थ बंबोळे आहेत.
श्री महेशकुमार (डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट), श्री शिवमाथन (डायरेक्टर ऑफ फायनान्स) आणि मा. अनिल कोकाटे (महाव्यवस्थापक ऍडमिन) यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मान पत्र प्रदान करण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांची प्रतिक्रिया :
· तेजिंदर सिंग रेणू
नागपुरात मेट्रोचे कार्य वेगाने सुरु असून विविध कार्याचे निराळे, मनमोहक, आकर्षक असे छायाचित्र काढण्याची नवी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महा मेट्रोचे आभार.
· रिषभ पालीवाल
स्पर्धेमुळे छायाचित्राचे विविध स्वरूप जाणून घेण्यास मदत मिळते. भविष्यात देखील ही स्पर्धा अशीच सुरु राहावी.
· अभिनव फटिंग
‘माझी मेट्रो फोटोग्राफी कॉन्टेस्ट’मुळे फोटोग्राफी क्षेत्रात करियर करण्याची प्रेरणा मिळते. महा मेट्रो फेसबुक पेजवर पाठविलेले छायाचित्र पाहून आनंद होतो.