Advertisement
नागपूर : शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनकस्टम्सच्या एअर कस्टम्स यूनिट आणि एअर इंटेलिजन्स यूनिटच्या टीमने मोठी कारवाई करत 61 लाखांचे सोने जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित प्रवाशाची तपासणी केली असता 2 ट्रॉली बॅगमध्ये सोने चांदीच्या रंगाच्या जाड तारांच्या स्वरूपात लपवून ठेवलेले आढळून आले. वायरच्या स्वरूपात असलेल्या सोन्याला चांदीचा लेप दिला होता.
या कारवाईत 858.33ग्रॅम सोने पकडण्यात आले. या सोन्याची एकूण किंमत जवळपास 61,25,549 रूपये इतकी आहे. कतार एअरवेजने (फ्लाइट क्र. क्यूआर-590) दोहाहून नागपूरला जात असलेल्या दोन प्रवाशांकडून सोने जप्त केले आहे.या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून कस्टम विभागाने पुढील तपास सुरु केला आहे.