Advertisement
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपप्रणीत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जागेवर आघाडी कायम ठेवली आहे. मात्र, कामठीच्या जागेवर भाजपला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ३१४४ मतांनी पिछाडीवर आहेत. बावनकुळे मागे राहणे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.
कामठी मतदारसंघातून हाती आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांना ५०९३३ मते मिळाली तर चंद्रशेखर बावनकुळे ४७७८९ मते मिळाली आहे.